1 Corinthians 4:5 in Marathi 5 म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
Other Translations King James Version (KJV) Therefore judge nothing before the time, until the Lord come, who both will bring to light the hidden things of darkness, and will make manifest the counsels of the hearts: and then shall every man have praise of God.
American Standard Version (ASV) Wherefore judge nothing before the time, until the Lord come, who will both bring to light the hidden things of darkness, and make manifest the counsels of the hearts; and then shall each man have his praise from God.
Bible in Basic English (BBE) For this reason let there be no judging before the time, till the Lord comes, who will make clear the secret things of the dark, and the designs of the heart; and then will every man have his praise from God.
Darby English Bible (DBY) So that do not judge anything before [the] time, until the Lord shall come, who shall also both bring to light the hidden things of darkness, and shall make manifest the counsels of hearts; and then shall each have [his] praise from God.
World English Bible (WEB) Therefore judge nothing before the time, until the Lord comes, who will both bring to light the hidden things of darkness, and reveal the counsels of the hearts. Then each man will get his praise from God.
Young's Literal Translation (YLT) so, then, nothing before the time judge ye, till the Lord may come, who will both bring to light the hidden things of the darkness, and will manifest the counsels of the hearts, and then the praise shall come to each from God.
Cross Reference Matthew 7:1 in Marathi 1 तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करू नका.
Matthew 24:30 in Marathi 30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.
Matthew 24:46 in Marathi 46 जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य!
Matthew 25:21 in Marathi 21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
Matthew 25:23 in Marathi 23 “मालक म्हणाला, ‘चांगल्या आणि विश्वासू दासा! तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!
Luke 6:37 in Marathi 37 दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
Luke 12:1 in Marathi 1 आणि त्या दरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता अाणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला: परुश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा.
John 5:44 in Marathi 44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता, आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?
John 21:22 in Marathi 22 येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.”
Romans 2:1 in Marathi 1 म्हणून दुसर्याला दोष 2लावणार्या, अरे मनुष्या, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्याला दोष लावतोस त्यांत तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 2:16 in Marathi 16 देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे, जेव्हा माणसांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.
Romans 2:29 in Marathi 29 कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय; आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय. आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.
Romans 14:4 in Marathi 4 दुसर्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्याला स्थिर करण्यास समर्थ आहे.
Romans 14:10 in Marathi 10 मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
1 Corinthians 1:7 in Marathi 7 म्हणून तुम्हांत कोणत्याही आत्मिक दानाची कमतरता नाही, तर तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहता.
1 Corinthians 3:8 in Marathi 8 जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत, आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल
1 Corinthians 3:13 in Marathi 13 तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा करील.
1 Corinthians 11:26 in Marathi 26 कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
1 Corinthians 15:23 in Marathi 23 पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले लोक जिवंत केले जातील.
2 Corinthians 4:2 in Marathi 2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटवितो.
2 Corinthians 5:10 in Marathi 10 कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्याला त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
2 Corinthians 10:18 in Marathi 18 कारण स्वतःची प्रशंसा करणारा पसंतीस उतरत नाही, पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच पसंतीस उतरतो.
1 Thessalonians 5:2 in Marathi 2 कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.
Hebrews 4:13 in Marathi 13 आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हाला सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
James 4:11 in Marathi 11 बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविषयी वाईट बोलतो आणि नियमशास्त्राला दोष लावतो. पण तू जर नियमशास्त्राला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस.
James 5:7 in Marathi 7 यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.
1 Peter 1:7 in Marathi 7 म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.
1 Peter 5:4 in Marathi 4 आणि मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोमेजणारा हार मिळेल.
2 Peter 3:4 in Marathi 4 त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जश्या उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेंच चालू आहे.
2 Peter 3:12 in Marathi 12 त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तापून वितळतील.
Jude 1:14 in Marathi 14 आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही ह्यांच्याविषयी संदेश देऊन म्हटले आहे की, ‘बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.
Revelation 1:7 in Marathi 7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेसुध्दा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील, होय, असेच होईल! आमेन.
Revelation 20:12 in Marathi 12 मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; आणि तेव्हा पुस्तके उघडली गेली. नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.