1 Corinthians 3:5 in Marathi 5 तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. जसे प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत.
Other Translations King James Version (KJV) Who then is Paul, and who is Apollos, but ministers by whom ye believed, even as the Lord gave to every man?
American Standard Version (ASV) What then is Apollos? and what is Paul? Ministers through whom ye believed; and each as the Lord gave to him.
Bible in Basic English (BBE) What then is Apollos? and what is Paul? They are but servants who gave you the good news as God gave it to them.
Darby English Bible (DBY) Who then is Apollos, and who Paul? Ministering servants, through whom ye have believed, and as the Lord has given to each.
World English Bible (WEB) Who then is Apollos, and who is Paul, but servants through whom you believed; and each as the Lord gave to him?
Young's Literal Translation (YLT) Who, then, is Paul, and who Apollos, but ministrants through whom ye did believe, and to each as the Lord gave?
Cross Reference Matthew 25:15 in Marathi 15 त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार रुपये दिले. दुसऱ्याला त्याने दोन हजार रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने एक हजार रुपये दिले. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला.
Luke 1:2 in Marathi 2 जे सुरुवातीपासून त्याचे प्रत्यक्ष साक्षी आणि त्या वचनाचे सेवक झाले, त्यांनीच आम्हाला ह्या गोष्टी कळविल्या .
John 3:27 in Marathi 27 योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
Romans 10:14 in Marathi 14 मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?
Romans 12:3 in Marathi 3 कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.
1 Corinthians 3:7 in Marathi 7 तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणारा काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे.
1 Corinthians 3:10 in Marathi 10 आणि देवाच्या कृपेने जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला. आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत. ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी.
1 Corinthians 4:1 in Marathi 1 आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
1 Corinthians 9:17 in Marathi 17 कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुध्द असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे.
1 Corinthians 12:4 in Marathi 4 आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे.
1 Corinthians 12:28 in Marathi 28 आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारेअसे नेमले आहेत.
2 Corinthians 3:3 in Marathi 3 शाईने नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे, तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यांवर कोरलेले,आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र अाहात, असे तुम्ही दाखवून देता.
2 Corinthians 3:6 in Marathi 6 त्याने आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण आत्म्याद्वारे केलेला आहे; कारण लेख मारून टाकतो, पण आत्मा जीवंत करतो.
2 Corinthians 4:5 in Marathi 5 कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, पण येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो, आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत.
2 Corinthians 4:7 in Marathi 7 पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, ह्याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे.
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
2 Corinthians 6:4 in Marathi 4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटांत, आपत्तीत व दुःखांत;
2 Corinthians 11:23 in Marathi 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) . मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
Ephesians 3:7 in Marathi 7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.
Colossians 1:25 in Marathi 25 आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यात मी मंडळीचा सेवक झालो आहे.
1 Peter 4:10 in Marathi 10 तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी ह्या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा.