1 Corinthians 2:14 in Marathi 14 स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात. आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात.
Other Translations King James Version (KJV) But the natural man receiveth not the things of the Spirit of God: for they are foolishness unto him: neither can he know them, because they are spiritually discerned.
American Standard Version (ASV) Now the natural man receiveth not the things of the Spirit of God: for they are foolishness unto him; and he cannot know them, because they are spiritually judged.
Bible in Basic English (BBE) For the natural man is not able to take in the things of the Spirit of God: for they seem foolish to him, and he is not able to have knowledge of them, because such knowledge comes only through the Spirit.
Darby English Bible (DBY) But [the] natural man does not receive the things of the Spirit of God, for they are folly to him; and he cannot know [them] because they are spiritually discerned;
World English Bible (WEB) Now the natural man doesn't receive the things of God's Spirit, for they are foolishness to him, and he can't know them, because they are spiritually discerned.
Young's Literal Translation (YLT) and the natural man doth not receive the things of the Spirit of God, for to him they are foolishness, and he is not able to know `them', because spiritually they are discerned;
Cross Reference Matthew 13:11 in Marathi 11 त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
Matthew 16:23 in Marathi 23 परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
John 3:3 in Marathi 3 येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
John 5:44 in Marathi 44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता, आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?
John 6:44 in Marathi 44 ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.
John 8:43 in Marathi 43 तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे हेच की, तुम्हाला माझे वचन ऐकवत नाही.
John 8:51 in Marathi 51 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही होणार नाही.”
John 10:20 in Marathi 20 त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे, आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचे का ऐकता?”
John 10:26 in Marathi 26 तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
John 12:37 in Marathi 37 त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांहि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;
John 14:26 in Marathi 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
John 15:26 in Marathi 26 पण जो पित्यापासून निघतो,ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
John 16:8 in Marathi 8 आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी खातरी करील.
Acts 16:14 in Marathi 14 तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती;ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची भक्ति करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले;तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले;
Acts 17:18 in Marathi 18 तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो ? दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो; कारण येशू व पुनरुत्थान हयाविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.
Acts 17:32 in Marathi 32 तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू
Acts 18:15 in Marathi 15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे. त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो!”
Acts 25:19 in Marathi 19 उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरून यहूदी लोकांनी त्या माणसाशी वाद केला. येशू हा जरी मेलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे.
Acts 26:24 in Marathi 24 पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्याला मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे!”
Romans 8:5 in Marathi 5 कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात.
1 Corinthians 1:18 in Marathi 18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
1 Corinthians 1:23 in Marathi 23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे.
1 Corinthians 2:12 in Marathi 12 परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण अोळखून घ्यावे.
1 Corinthians 15:44 in Marathi 44 जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठवले जाते ते आध्यात्मिक शरीर आहे.जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुध्दा असतात.
1 Corinthians 15:46 in Marathi 46 परंतु जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, जे जगिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते.
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
James 3:15 in Marathi 15 हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते.
1 John 2:20 in Marathi 20 पण जो पवित्र त्याच्यापासून तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे.
1 John 2:27 in Marathi 27 पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक -तो सत्य आहे, खोटा नाही - तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
Jude 1:19 in Marathi 19 हे फूट पाडणारे लोक देहबुद्धी स्वभावाचे, आत्मा नसलेले लोक आहेत.