1 Corinthians 15:2 in Marathi 2 जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असल्यास तिच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
Other Translations King James Version (KJV) By which also ye are saved, if ye keep in memory what I preached unto you, unless ye have believed in vain.
American Standard Version (ASV) by which also ye are saved, if ye hold fast the word which I preached unto you, except ye believed in vain.
Bible in Basic English (BBE) By which you have salvation; that is to say, the form in which it was given to you, if it is fixed in your minds, and if your faith in it is not without effect.
Darby English Bible (DBY) by which also ye are saved, (if ye hold fast the word which I announced to you as the glad tidings,) unless indeed ye have believed in vain.
World English Bible (WEB) by which also you are saved, if you hold firmly the word which I preached to you--unless you believed in vain.
Young's Literal Translation (YLT) through which also ye are being saved, in what words I proclaimed good news to you, if ye hold fast, except ye did believe in vain,
Cross Reference Luke 8:13 in Marathi 13 आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात, व परीक्षेच्या वेळी गळून पडतात.
John 8:31 in Marathi 31 ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
Acts 2:47 in Marathi 47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.
Acts 8:13 in Marathi 13 स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्पा बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अदभूत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.
Romans 1:16 in Marathi 16 कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
Romans 11:22 in Marathi 22 तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाहीतर, तूही छाटला जाशील.
1 Corinthians 1:18 in Marathi 18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
1 Corinthians 1:21 in Marathi 21 म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले.
1 Corinthians 15:11 in Marathi 11 म्हणून मी असो किंवा, ते असोत, आम्ही अशी घोषणा करतो, आणि तुम्ही असाच विश्वास धरला.
1 Corinthians 15:14 in Marathi 14 आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.
2 Corinthians 2:15 in Marathi 15 कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकांत आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकांत आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहो.
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
Galatians 3:4 in Marathi 4 तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय?ह्याला व्यर्थ म्हणावे काय?
Ephesians 2:8 in Marathi 8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे देवापासूनचे दान आहे,
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
2 Thessalonians 2:15 in Marathi 15 तर मग बंधूनो, स्थिर राहा, आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा.
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
Hebrews 2:1 in Marathi 1 ह्या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये.
Hebrews 3:6 in Marathi 6 परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे
Hebrews 3:14 in Marathi 14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.
Hebrews 4:14 in Marathi 14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान प्रमुख याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
Hebrews 10:23 in Marathi 23 आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
James 2:14 in Marathi 14 माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की, ‘माझ्याजवळ विश्वास आहे’; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्याला काय लाभ? विश्वास त्याला तारू शकेल काय?
James 2:17 in Marathi 17 म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
James 2:26 in Marathi 26 कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.