1 Corinthians 13:2 in Marathi 2 आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले, आणि, मला डोंगर ढळवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
Other Translations King James Version (KJV) And though I have the gift of prophecy, and understand all mysteries, and all knowledge; and though I have all faith, so that I could remove mountains, and have not charity, I am nothing.
American Standard Version (ASV) And if I have `the gift of' prophecy, and know all mysteries and all knowledge; and if I have all faith, so as to remove mountains, but have not love, I am nothing.
Bible in Basic English (BBE) And if I have a prophet's power, and have knowledge of all secret things; and if I have all faith, by which mountains may be moved from their place, but have not love, I am nothing.
Darby English Bible (DBY) And if I have prophecy, and know all mysteries and all knowledge, and if I have all faith, so as to remove mountains, but have not love, I am nothing.
World English Bible (WEB) If I have the gift of prophecy, and know all mysteries and all knowledge; and if I have all faith, so as to remove mountains, but don't have love, I am nothing.
Young's Literal Translation (YLT) and if I have prophecy, and know all the secrets, and all the knowledge, and if I have all the faith, so as to remove mountains, and have not love, I am nothing;
Cross Reference Matthew 7:22 in Marathi 22 त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भुते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.’
Matthew 13:11 in Marathi 11 त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
Matthew 17:20 in Marathi 20 तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा, असे तुम्ही म्हटल्यास तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”
Matthew 21:19 in Marathi 19 रस्त्याच्या कडेला त्याला अंजीराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्याला एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला ,सर्वकाळ फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले.
Matthew 21:21 in Marathi 21 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, जर तुम्हाला विश्वास असेल, आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजीराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.
Mark 11:22 in Marathi 22 येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
Luke 17:5 in Marathi 5 मग शिष्य प्रभू येशूला म्हणाले, 'आमचा विश्वास वाढव'.
Romans 11:25 in Marathi 25 बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही ह्या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.
1 Corinthians 4:1 in Marathi 1 आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
1 Corinthians 7:19 in Marathi 19 कारण सुंता झालेला असणे काही नाही किंवा बेसुंता असणे काही नाही; पण देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे सर्व काही आहे.
1 Corinthians 8:4 in Marathi 4 म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही, आणि एकाशिवाय दुसरा देव नाही,
1 Corinthians 12:8 in Marathi 8 कारण एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते , आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.
1 Corinthians 12:28 in Marathi 28 आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारेअसे नेमले आहेत.
1 Corinthians 13:1 in Marathi 1 मी मनुष्यांच्या आणि व देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
1 Corinthians 13:3 in Marathi 3 आणि मी जरी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
1 Corinthians 14:1 in Marathi 1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. आणि आध्यात्मिक दानांची विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.
1 Corinthians 14:6 in Marathi 6 आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का?
1 Corinthians 14:39 in Marathi 39 म्हणून माझ्या बंधूनो संदेश देण्यासाठी उत्सुक असा, अन्य भाषेत बोलणाऱ्याला मना करू नका.
1 Corinthians 16:22 in Marathi 22 जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर तो शापित होवो.“मारानाथा; हे प्रभू ये”
2 Corinthians 12:11 in Marathi 11 मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; तुम्ही माझ्याविषयी खातरी द्यायला पाहिजे होती कारण मी काहीच नसलो, तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही.
Galatians 5:16 in Marathi 16 म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Galatians 6:3 in Marathi 3 कारण आपण कोणी नसता कोणी तरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो.
Ephesians 3:4 in Marathi 4 जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या सत्य रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हाला समजता येईल,
Ephesians 6:19 in Marathi 19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करा,जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
Colossians 1:26 in Marathi 26 जे रहस्य युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता, त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे.
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
1 John 4:8 in Marathi 8 जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही. कारण देव प्रीती आहे.
1 John 4:20 in Marathi 20 “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा व्देष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.