1 Corinthians 1:2 in Marathi 2 ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीस
Other Translations King James Version (KJV) Unto the church of God which is at Corinth, to them that are sanctified in Christ Jesus, called to be saints, with all that in every place call upon the name of Jesus Christ our Lord, both their's and our's:
American Standard Version (ASV) unto the church of God which is at Corinth, `even' them that are sanctified in Christ Jesus, called `to be' saints, with all that call upon the name of our Lord Jesus Christ in every place, their `Lord' and ours:
Bible in Basic English (BBE) To the church of God which is in Corinth, to those who have been made holy in Christ Jesus, saints by the selection of God, with all those who in every place give honour to the name of our Lord Jesus Christ, their Lord and ours:
Darby English Bible (DBY) to the assembly of God which is in Corinth, to [those] sanctified in Christ Jesus, called saints, with all that in every place call on the name of our Lord Jesus Christ, both theirs and ours:
World English Bible (WEB) to the assembly of God which is at Corinth; those who are sanctified in Christ Jesus, called to be saints, with all who call on the name of our Lord Jesus Christ in every place, both theirs and ours:
Young's Literal Translation (YLT) to the assembly of God that is in Corinth, to those sanctified in Christ Jesus, called saints, with all those calling upon the name of our Lord Jesus Christ in every place -- both theirs and ours:
Cross Reference John 17:17 in Marathi 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
Acts 7:59 in Marathi 59 ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धांवा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.
Acts 9:14 in Marathi 14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना बांधून नेण्यासाठी मुख्य याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
Acts 9:21 in Marathi 21 ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, “यरूशलेम येथील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वाचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरूशलेम येथील मुख्य याजकासमोर उभे करणार आहे.”
Acts 10:36 in Marathi 36 देव यहूदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताव्दारे शांती जगात आली आहे. येशू सर्वाचा प्रभू आहे!
Acts 15:9 in Marathi 9 त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुध्द करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
Acts 18:1 in Marathi 1 नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला.
Acts 18:8 in Marathi 8 त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता. क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.
Acts 22:16 in Marathi 16 तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर .
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
Romans 1:7 in Marathi 7 रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्र जन होण्यास बोलावलेल्यांसः देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.
Romans 3:22 in Marathi 22 पण हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे. कारण तेथे कसलाही फरक नाही.
Romans 10:12 in Marathi 12 यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे.
Romans 14:8 in Marathi 8 कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो, आणि आपण मेलो तरी प्रभूकरता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी प्रभूचे आहोत.
1 Corinthians 1:30 in Marathi 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
1 Corinthians 6:9 in Marathi 9 अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही जारकर्मी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,
1 Corinthians 8:6 in Marathi 6 परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व काही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.
2 Corinthians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून; करिंथमधील देवाच्या मंडळीस व सर्व अखयामधील सर्व पवित्र जणांस
2 Corinthians 4:5 in Marathi 5 कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, पण येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो, आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत.
Galatians 1:2 in Marathi 2 आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधू ह्यांजकडून गलतीयाच्या मंडळ्यास;
Ephesians 5:26 in Marathi 26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.
Philippians 2:9 in Marathi 9 ह्यामुळे देवाने त्याला सर्वांहून उंच केले आहे. आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आहे.
1 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव पित्याच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलीनीकाकरांची मंडळी हिला पौल,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो.
1 Thessalonians 4:7 in Marathi 7 कारण देवाने आपल्याला अशुध्दपणासाठी नव्हे तर तुम्हास पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.
2 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल ,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
1 Timothy 3:15 in Marathi 15 तरी मला उशीर लागल्यास , देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे , हे तुला समजावे.
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
2 Timothy 2:22 in Marathi 22 पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुध्द अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या मागे लाग.
Hebrews 2:11 in Marathi 11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही.
Hebrews 10:10 in Marathi 10 देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.
Hebrews 13:12 in Marathi 12 म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांना पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशी बाहेर मरण सोसले,
1 Peter 1:15 in Marathi 15 परंतु तुम्हाला ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
Revelation 19:16 in Marathi 16 त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ असे नाव लिहिलेले आहे.